जुन्या आठवणींना उजाळा देत सचिन पिळगावकर यांनी शेअर केला लक्ष्यासोबतचा ‘तो’ फोटो

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मनोरंजन श्रुष्टीला एकापेक्षा एक असे अनेक भन्नाट चित्रपट दिले आहे. त्यांच्या अभिनयाच कराव तेवढ कौतुक थोड आहे. हा सर्वांचा लाडका आणि विनोदाचा बादशाह आता आपल्यात आणि पण त्याची आठवण मात्र सतत आपल्यात असते. त्यांचे चित्रपट पाहून आजही लोकांच्या डोळ्यात हसून हसून पाणी येत.

कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल वेगळ स्थान निर्माण केल होत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केल होत. करीयरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. चाहत्यांच मन जिंकून सगळ्यांचा ‘लाडका लक्ष्या’ झाला.

लक्ष्याने प्रेक्षकांच्या मनात तर घर केलेच होते परंतु त्याच्या सहकलाकारांच्या जीवनाचा एक भाग होता. म्हणूनच निवेदिता सराफ यांच्या वाढदिवशी सचिन पिळगावकर यांना लक्ष्याची आठवण आली होती. निवेदिता सोबतचा लक्ष्याचा फोटो शेअर करत मिस करत असल्याची पोस्ट सचिन यांनी टाकली.

‘लक्ष्मीकांत-महेश कोठारे-अशोक सराफ’ या तीन विनोदवीरांना प्रेक्षकांनी मनात जागा दिली होती. त्याचवेळी लक्ष्मीकांत-सचिन पिळगावकर-अशोक सराफ या त्रिकुटालाही लोकांनी डोक्यावर घेतले. या त्रिकुटाने एकामागून एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले, जसे की, भुताचा भाऊ, आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी असे अनेक चित्रपट पाहायला मिळतील.

लक्ष्याच सगळ्यांशीच चांगल जमलं म ते महेश कोठारे असू किवां सचिन पिळगावकर असुदे. त्याचं पडद्यावर अभिनेता दिग्दर्शक किवा सहकलाकार या नात्यासोबातच त्यांच्याशी घट्ट मैत्रीच नात देखील असायचं. तसच गरिबीतून वर आल्याकारणाने गरिबांच्या दुःखाची सतत जाणीव असायची. लक्ष्याने अनेकवेळा गरजूंना मदत केल्याची समजते.

असा हा विनोदाचा बादशाह शेवटच्या क्षणापर्यंत चाहत्यांना हसवत राहिला. किडनीसारख्या भयंकर आजाराने महाराष्ट्राच्या लाडक्या लक्ष्याला सर्वांपासून हिरावून घेतले. लक्ष्यान १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. इतक्या वर्षानंतरही लक्ष्याच्या अभिनयाची जादू लोकांच्या मनावर राज्य करते.

हे ही वाचा-

तुमच्या लाडक्या लक्ष्याची मुलगी स्वानंदी सौंदर्यात देते मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मात; पहा तिचे सुंदर फोटो

चंपकलाल रोल नाकारून मिळाला जेठालाल रोल; वाचा कसे पोहचले जेठालाल घरोघरी

इंडिअन आयडल १२ ची संभाव्य विजेती षण्मुख प्रिया आणि तिच्या आईने केला संताप व्यक्त; म्हणाली मायकल जाक्सनलाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.