Share

Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar : “मी १४ वर्षांचा होतो तेव्हा संजीव कुमार थेट माझ्या घरी आले आणि ऑटोग्राफ घेतला”, सचिन पिळगावकरांनी सांगीतला ‘तो’ किस्सा

Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय किस्सा सांगितला आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा प्रसंग चाहत्यांच्या मनाला भिडणारा ठरतोय. त्यांनी आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ कोणी घेतला आणि त्यांनी पहिल्यांदा कोणाचा घेतला, याबाबतचे अनुभव अत्यंत प्रेमाने सांगितले.

सचिन पिळगावकर यांनी सांगितले की, “मी तेव्हा १४-१५ वर्षांचा होतो. माझे वडील आणि विशूराजे (Vishu Raje) हे मित्र होते. त्यांना हा माझा मार्ग एकला हा चित्रपट हिंदीत बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी संजीवकुमार (Sanjeev Kumar) यांना ट्रायलला बोलावलं होतं. हे सत्र अजंथा आर्ट (Ajantha Art) स्टुडिओमध्ये ठेवलं होतं.”

संजीवकुमार यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता त्यांनी विशूराजेंना विचारलं की, ‘सचिन कुठे राहतो माहिती आहे का?’ त्यांनी लगेच उत्तर दिलं ‘हो, चला.’ गाडीत बसून ते सांताक्रुझ (Santacruz) येथील स्टेशनरी शॉपवर गेले. तिथून एक ऑटोग्राफ बुक आणि पेन घेतलं. त्यानंतर थेट सचिन यांच्या घरी पोहोचले.

सचिन म्हणतात, “वडिलांनी दरवाजा उघडला आणि समोर हरीभाऊ (Hari Bhai) म्हणजे संजीवकुमार उभे! त्यांनी विचारलं ‘सचिन आहे का?’ मी त्यांच्यासमोर गेलो. ते म्हणाले ‘मी आताच तुझा चित्रपट पाहिला. आयुष्यात कधीच कोणाचा ऑटोग्राफ घेतला नाही, पण पहिला ऑटोग्राफ तुझाच हवा.’ तेव्हा मी लिहिलं ‘हरीभाऊ, विथ लव्ह सचिन.’ मी कधीच विसरणार नाही तो क्षण.”

यानंतर सचिन यांनी स्वतःचा पहिला घेतलेला ऑटोग्राफही आठवला. “मी ७ वर्षांचा असताना राजकमल स्टुडिओ (Rajkamal Studio) मध्ये गेलो होतो. तिथे मधुबाला (Madhubala) यांना पाहिलं. मी ओरडलो ‘मधुआंटी’ आणि पळून गेले त्यांनी पाहिलं, मिठी मारली आणि मी म्हटलं एक ऑटोग्राफ द्या. त्यांनी दिला. तेव्हा मला त्यांच्या सुंदरतेपेक्षाही अधिक सुंदर वाटले ते त्यांच्या पायांचं सौंदर्य. त्या मला ब्रेकमध्ये भेटायला आल्या. तो ऑटोग्राफ मी वहीवर घेतला होता, माझं ऑटोग्राफ बुक नव्हतंच.”

या आठवणींनी सचिन पिळगावकर भावूक झाले. त्यांच्या या कथनाने चाहत्यांनाही जुन्या आठवणींच्या प्रवासावर नेलं आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now