Share

सचिनने बनवली ढांसू प्लेईंग ११; रोहित, विराट, धोनीलाही दिला डच्चू, ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आयपीएल २०२२ मधील सर्वोत्तम प्लेयिंग इलेव्हन निवडली आहे. या प्लेयिंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरने(Sachin Tendulkar) दिग्गज खेळाडूंना स्थान दिलेले नाही. सचिन तेंडुलकरने या प्लेयिंग इलेव्हनमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माचा समावेश केलेला नाही. याशिवाय या प्लेयिंग इलेव्हनमध्ये भारताचे माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनी यांना देखील स्थान देण्यात आलेले नाही. (sachin ipl playing elevan team)

आयपीएल २०२२ हंगामातील कामगिरीवर सचिन तेंडुलकरने प्लेयिंग इलेव्हन निवडली आहे. सचिन तेंडुलकरने निवडलेली प्लेयिंग इलेव्हन पाहून सर्व क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. सचिन तेंडुलकरने या प्लेयिंग इलेव्हनमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि कागिसो रबाडा यांसारख्या खेळाडूंना देखील स्थान दिले नाही.

सचिन तेंडुलकरने हार्दिक पांड्याला आपल्या प्लेयिंग इलेव्हनचा कर्णधार म्हणून निवडले आहे. याशिवाय सचिन तेंडुलकरने राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलरची आणि पंजाब किंग्जचा खेळाडू शिखर धवनची निवड सलामीवीर जोडी म्हणून केली आहे. जोस बटलरने यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक ८६३ धावा केल्या आहेत.

जोस बटलर आयपीएलमधील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. याशिवाय शिखर धवनने ४६० धावा केल्या आहेत. लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलची सचिन तेंडुलकरने प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे. केएल राहुलची सचिनने नंबर-३ चा फलंदाज म्हणून निवड केली आहे. तसेच दिनेश कार्तिकचा विकेटकिपर म्हणून समावेश केला आहे.

याशिवाय डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन या सर्वोत्तम फिनिशरचा देखील सचिन तेंडुलकरने प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर सचिन तेंडुलकरने गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर सोपवली आहे. याशिवाय युजवेंद्र चहल आणि राशिद खान या दोन लेगस्पिनरचा देखील सचिन तेंडुलकरने प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

यापूर्वी भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यांनी देखील आपली प्लेयिंग इलेव्हन निवडली आहे. यंदाच्या आयपीएलचे विजेतेपद गुजरात टायटन्स या संघाने पटकावले आहे. यावेळी आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अरे वा! आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार KGF 2, ‘या’ OTT वर होणार प्रदर्शित
‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं; पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ
गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं! डोक्यावर जखमांच्या खुणा; पोलिसांनी घेतली ‘ही’ ॲक्शन

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now