लग्नाला २०० गाई वऱ्हाडी, जेवणाला पुरणपोळीचा बेत; लातूरच्या लग्नाची राज्यभरात चर्चा

माणसाच्या आयुष्यात लग्न हा अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे लग्न कसे असावे याचा तो आधीपासूनचविचार करुन ठेवतो. प्री-वेडींग शुट, डेस्टिनेशन वेडींग, याबाबत लोक विचार करत असतात, पण कोरोनाच्या संकटामुळे या सर्व गोष्टींवर बंदी आली आहे.

लग्नात फक्त २५ लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. अशात लातूरमध्ये एक लग्न पार पडले आहे. ज्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण यामध्ये तब्बल २०० गाई वऱ्हाडी बनल्या आहे.

लातूरमध्ये डॉ. भाग्यश्री आणि डॉ. सचिन या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. हा अनोखा लग्न सोहळा आता पुर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या वेळी कोरोनाचे सर्व नियम पाळत हा सोहळा कार्यालयात नाही, तर गोशाळेत पार पडला आहे.

या सोहळ्यात २०० पेक्षा जास्त गाई वऱ्हाडी म्हणून होत्या. लातूर शहरातील माहेश्वरी समाजातील डॉक्टर भाग्यश्री गोपाळ झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालूक्यातील कुंभारी पिंपळगाव येथील डॉ. सचिन सत्यनारायण चांडक यांचा विवाह आज श्री. गुरु गणेश जैन गोशाळेत आज करण्यात आला आहे.

हा विवाह सहा महिन्यांपुर्वीच ठरला होता. मात्र कोविड संसर्गामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन होईल, अशाप्रकारे विवाह सोहळा पार पाडण्याचा विचार दोघेही कुटुंब करत होते.

त्यानंतर लग्नाची तारीख तर ठरली, पण कुठे लग्न करायचे याबाबत चर्चा सुरु झाली. त्यावेळी त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी विवाहसोहळा गोशाळेत पार पाडण्याचा ठरवला. सर्वांना तो विचारही आवडला.

आज अतिशय मोजक्या लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी त्यांनी दोनशे गायींसाठी पुरणपोळीचा बेत ठेवला होता. तसेच जे लोकही लग्नास हजर होते, त्या सर्वांनी कोरोना नियमांचे पालन केले होते.

महत्वाच्या बातम्या-

थरारक चकमकीत पोलीसांनी चोरासह पकडले ४४० हिरे; किंमत ऐकून घालाल तोंडात बोटे
महिलांच्या शरीरयष्टीतील ‘या’ तीन गोष्टींवरून तुम्ही ओळखू शकता त्यांचा स्वभाव; जाणून घ्या कसा…
लस घेताना फालतू नाटकं करणाऱ्या मुलीला डाॅक्टरांनी झापले, म्हणाले चल निघ इथून..;पहा हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.