मराठमोळी अभिनेत्री सायलीच्या लव्हला क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने दिला प्रतिसाद; वाचा किस्सा.

सध्या आयपीएल बंद झाल्यामुळे वातावरण थंड झाले आहे. कोरोनाचा काळ वाढत चालल्यामुळे आणि आयपीएलच्या संघांमधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवस आयपीएल बंद ठेवण्यात आले आहे. पण आयपीएल बंद झाली झाली असली तरी एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे.

आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केलेला चेन्नई सुपर किंग्स संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या कमेंट गेमची सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सायलीने ऋतुराजच्या फोटोवर कमेंट करून सगळ्यांना चकित करू टाकले होते.

सायली संजीव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नवीन फोटो टाकले असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पण त्यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते ऋतुराज गायकवाड याच्या कमेंटने.

ऋतुराज गायकवाड याने तिच्या फोटोवर ‘Woahh’ अशी कमेंट करून त्यांच्यात चाहत्यांना चर्चेला विषय दिला आहे. सायलीने पण त्याच्यावर कमेंट केली असून ती कमेंट हर्ट इमोजीची आहे. त्यामुळे आता कमेंटचा खेळ कुठपर्यंत चालतो ते पाहावे लागणार आहे.

सायली संजीव हिने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेनंतर सायली संजीव मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात आली होती. काहे दिया परदेशी मालिकेत तिने केलेल्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

सध्या ती कलर्स मराठी वाहिनीवरील शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत काम करत आहे. तिची आणि सुयश टिळकची जोडी यात चांगली जमून आली आहे. ती लवकरच झिम्मा चित्रपटात दिसणार असून त्याचा टिझर पण लाँच झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.