ऋतुराज गायकवाडने केला खास विक्रम; जो विक्रम धोनी आणि सुरेश रैनाही करू शकले नाही

चेन्नई सुपर किंग्जसाठी हा आयपीएलचा हंगाम काही खास नव्हता. महेंद्रसिंग धोनीची टीम प्ले-ऑफमधून बाहेर पडणारी पहिला टीम ठरली. पण सीएसकेसाठी सर्वात विशेष बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडने असा विक्रम केला जो सीएसकेचा कर्णधार धोनी आणि संघाचा सर्वोच्च धावा करणारा सुरेश रैना किंवा इतर कोणत्याही फलंदाज शकला नाही.

ऋतुराजने कोरोनाशी झुंज देऊन संघात सुरुवातीचे काही सामने चांगली खेळी केली नाही. पण त्याने हार मानली नाही. बॅक-टू-बॅक 3 फिफ्टी आणि मॅन ऑफ द मॅच विजेतेपद जिंकले. असे करणारा तो सीएसकेचा पहिला खेळाडू आहे.

सीएसके टीमच्या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या कर्णधार धोनीने टीममधल्या युवा खेळाडूंवर निशाणा साधला. टीममधल्या तरुणांमध्ये स्पार्क दिसत नसल्याचे धोनी म्हणाला. यानंतर ऋतुराजने धोनीला चुकीचे ठरवले. सलग तीनवेळा अर्धशतक करून धोनीच्या शब्दाला ऋतुराजने खोटे ठरवून दाखावले.

आयपीएलमधील सलग तीन सामन्यात फिफ्टी बनविणारा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाबाद ६५ आणि कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध ७२ धावांची खेळी केली. पंजाबविरुद्ध ६२ रनची खेळी केली.

ऋतुराज गायकवाडची कोरोना टेस्ट दोनदा पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला इतर खेळाडूंपेक्षा दुप्पट कालावधी क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे त्याने सरावालाही उशिरा सुरुवात केली. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर धोनीने ऋतुराजला संधी दिली, पण त्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच मॅचमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला, यानंतर पुढच्या मॅचमध्ये ५ रन आणि नंतर पुन्हा शून्य रनवर त्याला जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या

तारक मेहतातील छोट्या गोगीला मिळाली जीवे मारण्याची धमकी? स्वत:च सांगीतले त्या रात्रीचे सत्य

वाचून विचित्र वाटेल पण देवमाशाची उलटी सोन्यापेक्षा महाग असते, कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.