रशियाने केली पहिली कोरोनावरील लस लॉन्च; राष्ट्रपती पुतीन यांच्या मुलीला दिला पहिला डोस

कोरोनाने जगभरात थैमान घातलेले असताना सर्व लोकांना कोरोना लसीची प्रतीक्षा होती ती लस रशियाने लॉन्च केली आहे. या लसीला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे.

एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्या मुलीला या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे असे त्यांनी स्वतः सांगितले आहे. रशियाचा हा दावा जर खरा असेल तर ही जगातील पहिली यशस्वी ठरलेली कोरोना लस असेल.

आतापर्यंत कोणत्याही देशात कोरोना लसीची शेवटची चाचणी करण्यात यश आलेले नाही. रशियाने लॉन्च केलेली ही लस रशियन मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे.

रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येईल. रशियाने फिलिपीन्सला ही लस देण्याची ऑफर दिली होती आणि ती त्यांनी मान्यही केली.

एवढंच नाही तर फिलिपीन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी स्वतःला पहिल्यांदा ही लस टोचून घेण्याचे ठरवले आहे. महत्वाची बाब म्हणजे, क्लिनकल ट्रायलदरम्यान रशियाच्या संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.