ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या ४१ मंत्र्यांनी दोन दिवसांत राजीनामे दिले. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. यामुळे बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक(Rushi Sunak) यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.(rushi sunak become britan new prime minister? know about him)
ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. ऋषी सुनक यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या ४० मंत्र्यांनी राजीनामे दिले. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन व्यक्तीची त्या जागी निवड करण्यात येणार आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर नेते आहेत. पण त्यामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये ऋषी सुनक यांची अर्थमंत्री पदासाठी निवड करण्यात आली होती.
ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. १९६० मध्ये ऋषी सुनक यांचे आजोबा आपल्या मुलांसह ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. ऋषी सुनक यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक असे आहे. ऋषी सुनक यांच्या वडिलांचा जन्म केनियामध्ये झाला होता. तर आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला होता.
ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी साउथम्प्टन, यूकेमध्ये झाला होता. ऋषी सुनक यांचे वडील यशवीर सुनक हे डॉक्टर होते. ऋषी सुनक यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठात ऋषी सुनक यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
ऋषी सुनक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात ऋषी सुनक यांना ‘फुलब्राईट स्कॉलरशीप’ देखील मिळाली होती. पदवीनंतर ऋषी सुनक यांनी गोल्डमन सॅक्समध्ये काम केले. त्यानंतर हेज फंड फर्ममध्ये ऋषी सुनक भागीदार बनले. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करताना ऋषी सुनक यांची इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या मुलीशी म्हणजेच अक्षता मूर्तीशी ओळख झाली होती. त्यानंतर ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी लग्न केले होते. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटातू ब्रिटनला बाहेर काढण्यामध्ये ऋषी सुनक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
महत्वाचा बातम्या :-
शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ‘ती’ कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल
शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात, केली निष्ठा यात्रेची घोषणा
मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता कोल्हापूर, सांगलीतील…