तुला चोपणार! राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या लेखकाला रूपाली ठोंबरेंची थेट धमकी

चपराकचे संपादक आणि प्रकाशक लेखक घनश्याम पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांनी असे शीर्षक दिले होते की जगाला हेवा वाटणारी सेटलमेंट मला करायची आहे आणि खाली राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांनी एक भलामोठा ब्लॉग लिहीला होता.

त्यात त्यांनी लिहीले होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटते. त्यानंतर अनेक मनसे नेत्यांकडून या ब्लॉगवर संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनीही घनश्याम पाटीला यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे घनश्याम पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस अशा शब्दात त्यांनी घनश्याम पाटलांचा समाचार घेतला आहे.

रूपाली ठोंबरे यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे की, स्वतःला लेखक म्हणाऱ्या या बिकावू, स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेधघनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस.

आमच्या पक्ष अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरेंबद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे की तुला कायदेशीर कारवाई तर करणार पण बिकावू लेखक म्हणून मनसे चोप पण देणार. अरे लेखक आहेस ना तू वास्तव्याचे प्रश्न समजत नसतील तर कसला आला रे लेखक.

प्रसिद्धीसाठी कोणीही भुरटे लोक उठतात आणि स्वतःला लेखक म्हणून मानसिक रुग्णा सारखे लिहतात. घनश्याम तुझ्या माहितीसाठी कृष्णकुंज वर न्यायासाठी लोक येतात. कारण लोकांची आणि आमची विश्वासाची स्टेलमेंट झाली आहे हे लक्षात ठेव आणि तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव.

आमच्या साहेबांबद्दल लिहताना जरा वास्तव्याचे खरी परिस्थिती लिहिण्याचे धैर्यतुझ्या सारख्या स्वतःला लेखक म्हणाऱ्याकडे नाही. असो तू लेखक म्हणून छपरी आहेसच पण माणूस म्हणून तू बिकावू ,मानसिक रुग्ण आहेस.

आम्ही मनसे वास्तव्य आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनतेच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे. उगीच नाही लोक प्रश्न घेऊन मा. राज साहेबांकडे येत जय महाराष्ट्र. माझ्या बहिणींनो भावांनो नुसते वाचू नका या घनश्याम ला त्याची जागा दाखवून देऊकी लेखक म्हणून तू छपरी, बिकाऊ आहेस, अशी पोस्ट करून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.