मुंबई | मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जेव्हा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांची भेट घेतली आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा काही लोकांनी विकृत कंमेंट्स केल्या. यानंतर रुपाली ठोंबरे संतापल्या आहेत. त्यांनी या सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून त्यांची नावे जाहीर केली आहेत.
त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे की, पुणे पदवीधर मतमोजणीच्या वेळी महविकास आघाडीचे आमदार रोहित दादा पवार यांनी भेट घेतली त्याची पोस्ट मी टाकली तेव्हा पासून काही विकृत लोक जे मनसैनिक म्हणणारे अत्यंत अश्लील कमेंट करताना दिसत आहे.
वास्तविक असे लोक मनसेसैनिक असूच शकत नाही कारण आमचे मनसेसैनिक कधीच महिलांना घाण भाषा, शिवीगाळ किंवा अश्लील बोलणारे नाही हे ठाम सांगू शकते. आता राहिले जे विकृत पोस्ट करतात त्यांनी जी काही अश्लील भाषा बोलतात ते त्यांच्या आई बहीणीशी असे बोलत असतील ही पैदास घाणीतील त्यामुळे ज्यांनी अकाउंट काढले ज्यांनी विकृत पोस्ट केली.
त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई नक्कीच होणार, मनसे रणरागिणी महिलांची कारवाई. आणि हो मनसे भाजप एकत्र येईल नाही येईल हा संपूर्ण अधिकार मा. राज साहेब ठाकरे यांचा आहे. कोणताही मनसे सैनिक यांनी सोशल वर विनाकारण बोलू नये आणि खरा मनसैनिक आमचा वायफळ बोलत नसतो.
बाकी विकृत,अश्लील लोकांवर कारवाई सुरू. माझ्या भावानों, बहिनींनो अशा लोकांची विकृती ठेचून काढू अजिबात सुट्टी नाही द्यायची. अश्लील बोलणाऱ्या नाजायज अनाऔवर्स औलादानो मोजून 4 ते 5 दिवस तुमच्या अश्लील बोलणाऱ्यांची विकृती मनसे ठेचनार बरं. तुमच्या आई बहिणी आता सुरक्षित ठेवा बरं दुसऱ्यांच्या आई बहिणीला बोलता मग तुमच्या नको का? जशास तसे उत्तर.जय महाराष्ट्र, जय मनसे, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
या लोकांना डास जास्त चावतात, वाचा डासांबद्दल वैज्ञानिक आणि मनोरंजक माहिती
बॉलीवूडचे खतरनाक खलनायक प्राण शेवटच्या दिवसांमध्ये ‘असे’ आयुष्य जगत होते