मनसेच्या वाघिणीला तरूण वर्गाचा प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरली धडकी

मुंबई | मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील-ठोबरे यांना मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतून तरुण पदवीधर मतदारांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत रूपाली पाटील-ठोबरे यांनी केलेल्या दौऱ्यात घेण्यात आलेल्या मेळाव्याला झालेली गर्दी विरोधकांची डोकेदुखी वाढवणार असल्याचे दिसत आहे.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक आता रंगात आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

तसेच रूपाली पाटील-ठोंबरे यांना ओळखणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा तरुणवर्ग आहे. याचा फायदा रूपाली पाटील-ठोंबरे यांना या निवडणूकीत होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या अनेकदा आक्रमक झालेल्या आपण पाहिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या काळात अनेक रुग्णालयांना त्यांनी भेटी देऊन तेथील गैरप्रकार उघडकीस आणले होते.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख, आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. आता या निवडणूकीची रंगत आणखीन वाढू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
संजय राऊतांची बोलतीच बंद झालीय; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोमय्यांनी सुनावले
कोरोना लस गावागावात पोहचवण्यासाठी मोदी सरकारने राज्यांना पाठवला ‘हा’ प्लान
एबीपी माझा पुन्हा वादात; ‘या’ नेत्याने केला खोटी बातमी दिल्याचा आरोप; माफीची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.