मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
याचाच धागा पकडत मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. रुपाली पाटील फेसबुक पोस्टद्वारे म्हणतात, ‘ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
‘हे कोत्या मनोवृत्तीचे राजकारण…’
ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणतात, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
माझीही सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा थेट गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन
फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा गंभीर आरोप, ‘हे कोत्या मनोवृत्तीचे राजकारण’
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात