राज्य मंत्रिमंडळाने काल बैठकीत महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा भाजप(Bjp) नेते आक्रमकपणे विरोध करत आहेत. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपने काल केला होता.(rupali patil says bjp dont know difference between wine & alchohol)
त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी भाजप पक्षाला टोला लगावला आहे. भाजप पक्षाला वाईन व दारुमधला फरक समजत नाही का? असा खोचक सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपला केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
“सत्तापिपासू भाजपला वाईन व दारुतला फरक माहीत नाही का? सत्ता गेल्यापासून व पुन्हा सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून भांबावल्यागत झालेल्या भाजपा नेत्या मध्ये २०२४ ला विरोधीपक्षनेते होण्यासाठी एकमेकांत स्पर्धा चालू झाली आहे”, असे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे. यापूर्वी देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली होती.
वाईन विक्रीसंदर्भातील निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने करोनाच्या कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ दारूलाच आहे. महाविकास आघाडी सरकार नेमके आहे तरी कोणाचे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
राज्य सरकारच्या निर्णयावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे देखील संतापले होते. “महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार”, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.
या निर्णयावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे. भाजप आमदार यांनी या निर्णयासंदर्भात ट्विट केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल. त्यांनी महाराष्ट्रात मद्यक्रांती घडवली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येत्या काळात अफू आणि गांजाच्या शेतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठा खुलासा! जगात बदनाम असलेले Pegasus सॉफ्टवेअर २०१७ मध्ये मोदी सरकारने तब्बल ‘एवढ्या’ कोटींना घेतले
फाट्यावर दारू विकणारा आरोपी जेव्हा…; मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टिका
श्वेता तिवारी म्हणाली काहीतरी, लोकांनी घेतलं काहीतरी, व्हिडीओ पुर्ण पाहा आणि ऐका ती नेमकं काय म्हणाली..






