राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या आरोपांवर आता स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाने आरोप केले. आता मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.
मंत्री मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला “ज्यावेळी अत्याचार झाला त्याचवेळी गुन्हा दाखल करायचा होता एवढ्या दिवस का शांत बसलात” असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी संबंधित महिलेला ठणकवले आहे.
मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट वरून मत व्यक्त केले आहे “बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे..राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका.” आसे त्या म्हणाल्या.
“तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा.ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. २००६ पासून २०२० पर्यंत का शांत बसला? बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो.”
“बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका.” अशी फेसबुक पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.
“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?”
वाढदिवस साजरा करण्यासाठी दाम्पत्याने घेतली हॉटेलमध्ये रुम; सायंकाळी सापडले धक्कादायक अवस्थेत
भाजपाचा हल्लाबोल; ‘गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण…’