मुंबई | पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला. अरुण लाड व संग्राम देशमुख यांच्याशिवाय जनता दल सेक्युलरचे माजी आमदार शरद पाटील व मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे या देखील रिंगणात होत्या.
मात्र, खरी लढत लाड आणि देशमुख यांच्यात असल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट झाले. अखेर मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाला. परंतु पराभवानंतर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट मात्र प्रचंड चर्चेत आली आहे.
पोस्टमध्ये त्या म्हणतात, ‘श्री. अरुण लाड यांच्या कडून रखडलेली प्राध्यापक भरती, पदवीधर बेरोजगारी, ग्रामविकास खाते उमेद योजनचे पदविधारांचे काम खाजगीकरण न करणे, शिक्षक भरती, MPSC, UPSC परीक्षा वेळेत होणे, स्पर्धा परीक्षा निकाल लावणे याची संपूर्ण जवाबदारी जिंकून आलेल्या पदवीधर आमदारांची आणि त्यांना मतदान दिलेल्या पदवीधर मतदारांचे मनसे अभिनंदन.’
भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार..
पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला होता.
महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८ हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.
माझ्या विजयात चंद्रकांतदादांचा मोठा वाटा…
‘माझ्या विजयात चंद्रकात पाटील यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी दोन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊनही पदवीधरांसाठी काहीही काम केले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पदवीधरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले, अशी प्रतिक्रिया पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी आपल्या विजयाबाबत बोलताना व्यक्त केली.
मला ही संधी चंद्रकांत दादांमुळेच मिळाली. माझे राहिलेले काम संग्राम देशमुख करतील, असे दादा दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. प्रत्यक्षात दादांनी कामच केले नव्हते. त्यामुळे युवकांचा व पदवीधरांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे सगळ्यांनी हा बदल घडवत महाविकास आघाडीकडून कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे,’ असे लाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘आईचा अपमान सहन करणार नाही, जाहीर माफी माग’, कंगनाला भाजपने सुनावले
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..
मराठवाड्यानेही भाजपला डावललं; सतीश चव्हाणांची तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक