चर्चा! पुण्यात मनसेच्या रुपाली पाटलांचा मनसे स्टाईलने उमेदवारी अर्ज दाखल; पहा काय केलं..

पुणे । सध्या राज्यात पदवीधर निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्षांची आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. तसेच उमेदवारांनी आपले अर्ज देखील दाखल केले आहेत.

अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम मुदत आहे. यामध्ये आज मनसेच्या रुपाली पाटील यांनी पुणे पदवीधरसाठी भरलेला अर्ज बुधवारी लक्षवेधी ठरला. पाटील ठोंबरे यांनी एकप्रकारे मनसेची ‘हटके’ परंपरा कायम राखली आहे.

मनसे म्हटले की निवडणुकीतील प्रचार असो किंवा कुठले आंदोलन ते नेहमी हटके स्टाईलने करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ती परंपरा आजही पदवीधरसाठी अर्ज दाखल करताना रुपाली पाटील-ठोंबरे यांनी कायम ठेवली आहे. त्यांनी आज मनसेचे हजारो कार्यकर्त्यांसमवेत न येता एका बेरोजगार पदवीधर तरुणीसोबत येत तिच्याच हस्ते आपला निवडणूक उमेदवार अर्ज भरला.

त्यामुळेच त्या आज चर्चेचा विषय ठरल्या. याबाबत त्या म्हणाल्या, आज अर्ज दाखल करण्यासाठी मी सुद्धा मनसेचे पाच-दहा हजार कार्यकर्ते इतरांसारखे घेऊन येऊ शकले असते. पण फक्त एका पदवीधर बेरोजगार तरुणीला सोबत घेऊन तिच्याच हस्ते हा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.

कारण मला केवळ आमदार होण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही तर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावायचे आहे, असे त्या म्हणाल्या. या निवडणुकीत भाजपने मोठी तयारी केली आहे.

आज त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र पुणे पदवीधर मतदार संघात मोठी चुरस आहे. भाजपासासह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता मनसेने ही निवडणूक चुरशीची केली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समजणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.