सांगलीतील इस्लामपूर येथील भाषणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीवर वक्तव्य करत खिल्ली उडवली होती. या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी(Amol Mitakari) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाने आज पुण्यात आंदोलन केलं आहे.(rupali patil comment on bramhan mahasangh)
यावेळी ब्राम्हण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या घटनेदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे त्या ठिकाणी हजर होत्या.
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मत प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवावं, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला आहे. तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, असं आवाहन देखील रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केलं आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की, “त्यांनी आमच्या कार्यालयात घुसून मंत्र म्हणायला सुरवात केली. यावेळी ब्राम्हण महासंघाच्या काही महिला कार्यकर्त्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द देखील काढले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्हाला निषेध करायचा असल्यास तो लोकशाही मार्गाने करा”, असे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे पुढे म्हणाल्या की, “या आंदोलनानंतर आम्ही त्यांना देण्यासाठी १०१ रुपये दक्षिणा आणि केळी देखील आणली होती. परंतु ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते ते न घेताच निघून गेले. आमच्याकडून आणि अमोल मिटकरी यांच्याकडून कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत.”
“त्यांनी लोकशाही पद्धतीनं आंदोलन करावं. घरात घुसण्याची भाषा करू नये. अंगावर आलात तर डोक्यावर घेऊन जाऊ”, असे देखील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे पुढे म्हणाल्या आहेत. अमोल मिटकरींनी जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा प्रश्न ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवा, रुपाली पाटलांचा ब्राम्हण महासंघाला इशारा
…तर संजय राऊतांना सुबुद्धी येईल; देवेंद्र फडणवीसांचा टोला
हे सर्व सहनशीलतेच्या पलिकडे, आता मी पुढचं पाऊल उचलणार; रेणू शर्माच्या अटकेनंतर मुंडे कडाडले