“पूजाचा व्हिडिओ आला म्हणून लग्न करावं लागलं, भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हाला नाही”

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी आता पुजाशी लग्न केले आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप केला आहे. आता त्यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडिओ व्हायरल केला म्हणून पंकज यांनी पूजाशी लग्न करावं लागलं. आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

रुपाली चाकणकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे, त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ६ ऑक्टोबर २०२० ला वैदिक मंगलकार्यालयात पंकज आणि पूजाने नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला आहे.

त्यांच्याकडे प्रमाणपत्र होतं. वैदिक पद्धतीने त्यांनी विवाह केला नव्हता. म्हणून त्यांनी आज विवाह केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून पूजाला विचित्र वागणूक दिली जात होती. तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले जात होते, ही घटना समोर आल्यानंतर त्यांनी विवाह केला आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत;चे वैयक्तीक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणणार नाही. तिने वर्धा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्याकडे त्याची एक कॉपी आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहे. विवाह प्रमाणपत्रही माझ्याकडे आहे. तिला खुप त्रास होत होता म्हणून तिने व्हिडिओमधून वेदना मांडली होती. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागला. यात सुपारी वैगेरे घेण्याची भाजपसारखी आम्हाला सवय नाही, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा नाही; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल
‘मुख्यमंत्री वाजत गाजत येणारच, हिंमत असेल तर रोखा’, शिवसेनेचे राणेंना खुले आव्हान
हाय कॉलेस्ट्रॉलपासून हवीय सुटका? हे जालीम सल्ले पाळा आणि कॉलेस्ट्रॉलला बाय बाय बोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.