रुपाली चाकणकरांनी दाखल केली भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याविरोधात तक्रार; म्हणाल्या, मला न्याय मिळेल अशी अपेक्षा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात दरेकरांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रवीण दरेकरांनी राष्ट्रवादी पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणार पक्ष आहे, असे म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि महिला खुप आक्रमक झाल्या होत्या. तसेच माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. आता प्रवीण दरेकर यांच्याविरोधात कलम ५०९ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रवीण दरेकर यांनी इतक्या दिवसात महिलांची माफी मागितली नाही. त्यांनी महिलांना लज्जा होईल, असे वक्तव्य केले. उर्मटपणाची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मी स्वत: पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कायद्याच्या चौकटीत मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही प्रवीण दरेकर उपस्थित होते, यावेळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लश्र द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केले होते. तिथूनच या वादाला सुरुवात झाली होती.

त्यावेळी राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रावादीतील नेतृत्वाकडे बघा, कुठल्याही गरीब माणसाला आमदार, खासदार होता आले नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा. आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाने मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार; घोषणा मोदींची, पैसे मात्र राज्यांचे
“रोई ना जे याद मेरी आई” शहनाजच्या त्या गाण्यामुळे प्रेक्षक झाले भावूक…सिद्धार्थच्या आठवणी झाल्या पुन्हा ताज्या
ज्या गुरूने विद्या शिकवली त्याच गुरूला कायमचे संपवले; वाचा अट्टल गुन्हेगारालाही लाजवनारी आनंद गिरीची भयानक कृष्णकृत्ये…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.