‘नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट; मग मोदींनी पण राम मंदिराचे भूमिपूजन दिल्लीतून करावे’

 

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने बकरी ईदनिमित्ताने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

आता या मार्गदर्शक सुचनांवर एमआयएमचे खासदार इम्तियाज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

सर्व नियम आम्हालाच, तुम्हाला मात्र सूट हे चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिल्लीत बसून करावा, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

गर्दी टाळण्यासाठी सरकारने काही निर्देश केले आहेत. मात्र हे नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होत नाही का? त्यांनीही ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मकरित्या साजरा करावा, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहेत.

दरम्यान, ज्यांना जनवरांची ऑनलाईन खरेदी शक्य आहे ते करतील. पण ज्यांच्याकडे एक दोन जनावरे असतील त्यांनी काय करायचे, तसेच नेते, अधिकाऱ्यांकडे स्मार्टफोन आहे, पण सामान्य जनतेकडे नाही तर त्यांनी काय करावे? असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.