उद्यापासून भारतात होणार पाच मोठे बदल; जाणुन घ्या

१ डिसेंबर २०२० पासून भारतात पाच मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. एकीकडे या नव्या नियमांपासून तुम्हाला दिलासा मिळेल, दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. यात गॅस सिलिंडर, विमा प्रीमियम, रेल्वे, एटीएम पैसे काढण्याचे नियम आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांचा समावेश आहे.

१ डिसेंबर २०२० पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीसंदर्भात प्रमुख बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा केली जाते. डिसेंबरच्या सुरुवातीलाच गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. देशभरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

एक डिसेंबपासून पीएनबी २.० सुविधा सुरु करणार आहे. एक डिसेंबरापासून रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पीएनबी २.० एटीएममध्ये एकाच वेळेस १० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असल्यास ग्राहकांना ओटीपी बेस व्यवहार करावे लागलीत. त्यामुळेच नाईट अवर्समध्ये पैसे काढताना आता ग्राहकांना मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे.

तसेच आता पाच वर्षांनंतर विमा ग्राहक प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी करु शकतात. म्हणजेच १ डिसेंबर २०२० पासून एखादी विमा पॉसिली विकत घेतल्यानंतर पाच वर्षानंतर त्या पॉलिसीच्या प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करुन ती ग्राहकांना सुरु ठेवता येणार आहे.

तर भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२० पासून रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. कोरोना लॉकडाउननंतर अनेक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. आता एक डिसेंबरपासून काही विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. यामध्ये झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोन महत्वाच्या ट्रेन्सचाही समावेश आहे.

एकनाथ खडसे इन ॲक्शन! मोठा गैरव्यवहार उघड करणार; तेही पुराव्यासहीत

ऑक्सफर्डची कोरोना लस किती प्रभावी? अखेर WHO ने सोडले मौन; म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.