Share

Ruhinaz Shaikh Video : ओवैसी सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय शिवराय’ जयघोष; ठामपणे म्हणाली, ‘आम्ही एक इंचही मागे हटणार नाही!’

Ruhinaz Shaikh Video :  एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या गुरुवारी (दि.09) मुकुंदनगर (Mukundnagar), अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे झालेल्या सभेत पक्षाच्या महिला पदाधिकारी रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh) यांनी भाषणाची सुरुवात “जय शिवराय” या घोषणेनं केली. त्यांच्या या घोषणेनं उपस्थितांचे लक्ष वेधले आणि चर्चेला उधाण आले.

रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh) यांनी स्पष्ट केलं की, काहींना आश्चर्य वाटलं असेल की, मुस्लिम महिला “जय शिवराय” कसं म्हणू शकते. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे फक्त एका जातीचे नव्हते; त्यांनी 12 बलुतेदार आणि अठरापगड जातींसह स्वराज्य स्थापन केलं आणि त्यात मुस्लिम समाजही सहभागी होता.

रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh) यांनी समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तींवर टीका करत म्हटले, “आज काही लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न चालतोय. पण आम्ही इथून एक इंचही हटणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

एमआयएम (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली. ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले की, मोदी (Narendra Modi) हे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांची स्तुती करतात. नेतान्याहू यांनी 60 हजार लोकांचा खून केला, ज्यामध्ये 20 हजार महिला आणि 20 बालके होती; अशा नेतृत्वाची स्तुती करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठवाड्यातील पुरावर बोलताना असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले की, “महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं, परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मोठे आकडे सांगत आहेत. त्यांना नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रमाणे खोटं बोलणं थांबवावं आणि राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,” असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now