‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई | झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेतील राणादा आणि पाठक बाई यांची भूमिका ही अनेक प्रेक्षकांच्या आवडीची ठरली. तसेच या मालिकेतील पात्र, गावरान भाषा या सर्व गोष्टींमुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतले होते.

आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने गुपचुप साखरपूडा उरकल्याचे समोर आले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाला मॅटवर कुस्ती शिकवणाऱ्या सखीने सर्वांचा सुखद धक्का दिला आहे. सखीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव ऋचा आपटे असे आहे.

नुकतेच ऋचाने सोशल मीडिया पोस्टद्वारे एक वर्षभरापूर्वी साखरपूडा केल्याचे सांगितले आहे. ऋचाने अभिनेता क्षितीश दाते याच्याशी साखपुडा केला आहे. त्याच्यासोबतचा फोटो ऋचाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच बसला आहे.

दरम्यान, हा खास फोटो शेअर करताना ऋचाने ‘या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबर तिने हॅशटग वापरत ‘engagementin2020’ असे लिहिले आहे. ऋचाच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मराठी सेलिब्रिटींनी त्यांचा साखरपुडा झाल्याचे अनेकदा चाहत्यांपासून लपवून ठेवले आहे. ऋचानेही गेल्या वर्षी केलेल्या साखरपुड्याचा खुलासा या वर्षी केला आहे. परंतु सेलिब्रिटींच्या त्यांचा जीवनसाथी कोण आहे हे उघड केल्यानंतर चाहते त्यांना त्यांच्या भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतात. यापुर्वी मराठी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक दिवस तिचा साखरपुडा झाल्याची गोष्ट चाहत्यांना सांगितली नव्हती.

ऋचाप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुणाल बेनोडेकरसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. यामुळे ती लवकरच लग्नगाठ बांधणार हे नक्की झाले आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली नाही. अशात तिने साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी लग्नाचा धुमधडाका लावला आहे. या नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच अभिनेत्री अभिज्ञा भावे, मानसी नाईक आणि आशुतोष कुलकर्णी या कलाकारांनी सात फेरे घेतले आहेत. त्यानंतर मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब हीने अंकुश मरोदेसोबत लग्ननाठ बांधली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
…म्हणून ‘त्या’ बस कंडक्टरनं सोशल मीडियावर विकायला काढली स्वत:ची किडनी
‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’, भूषणसिंह होळकरांची टीका
पूजा चव्हाण आत्मह.त्येप्रकरणी चर्चेत आलेले संजय राठोड आहेत तरी कोण?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.