‘बिग बॉस’ फेम रुबीना दिलैकचे जुने फोटो झाले व्हायरल; फोटो पाहून ओळखणे आहे कठीण

‘बिग बॉस’ शोची लोकप्रियता दिवसेंदिव वाढतच आहे. बिग बॉसचा १४ वा सीजन सध्या टेलिव्हिजनवर सुरु आहे. टेलिव्हिजनवरील सर्वात विवादीत शो म्हणून बिग बॉसकडे पाहीले जाते. सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट आहे. शोची सुरुवात झाली तेव्हापासून सलमान खान शोचा होस्ट आहे.

या शोमध्ये भाग घेणारे सगळे कलाकार खुप प्रसिद्ध होत असतात. या सीजनमध्ये अभिनेत्री रुबीना दिलैक खुप जास्त प्रसिद्धझोतात आली आहे. रुबीना टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण बिग बॉसमध्ये आल्यानंतर ती अजूनच प्रसिद्ध झाली आहे.

रुबीनाच्या आयूष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना रुची आहे. लोकांना रुबीनाच्या व्यक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्यात रुची आहे. काही दिवसांपूर्वीच रुबीनाचे जुने फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. रुबीनाच्या कॉलेजच्या दिवसांमधील हे फोटो आहेत.

२००६ मध्ये रुबीनाने ब्यूटी कॉम्पीटिशनमध्ये सहभाग घेतला होता. रुबीनाने कॉलेजच्या दिवसांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत रुबीनामध्ये अनेक बदल झाले आहेत. ती आत्ता जशी दिसते तशी अगोदर दिसत नव्हती.

रुबीना दिलैकने २००६ मध्ये ‘मिस शिमला’ स्पर्धत सहभाग घेतला होता. ती या स्पर्धची विजेती झाली होती. २००६ मध्ये रुबीना मिस शिमला ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २००८ मध्ये रुबीनाने नॉर्थ इंडिया स्पर्धत सहभाग घेतला आणि ती त्या स्पर्धची देखील विजेती झाली.

त्यानंतर रुबीनाने ‘छोटी बहू’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या मालिकेने रुबीनाला घराघरात नेऊन पोहोचवले होते. या मालिकेनंतर रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले. आज ती टेलिव्हिजवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रुबीनाच्या सुंदरतेवर चाहते घायाळ आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण

संजय दत्तच्या पहील्या पत्नीने मृत्यूपूर्वी लिहीलेले ‘हे’ पत्र वाचून सर्वांना बसला धक्का; मुलगी त्रिशला झाली भावूक

विक्रम भट्टच्या प्रेमात पागल झालेल्या अमिषा पटेलने चप्पलने खाल्ला होता आईचा मार

‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.