नंबर प्लेटबाबत RTO ची मोठी घोषणा, हाय सेक्युरिटी नंबरप्लेट नसेल तर…

RTO च्या नवीन नियमानुसार जर १ डिसेंबरपासून वाहनांवर हाय सेक्युरिटी नंबरप्लेट नसेल तर तुमच्या गाडीची सगळी कामे रखडण्यात येणार आहे. व्यावसायिक वाहनांसाठी हाय सेक्युरिटी नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.

१ एप्रिल २०१९ च्या आधीच्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी नंबरप्लेट लावण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता. या नंबरप्लेटमध्ये HSRP एक होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसी नंबर असतोहा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो.

वाहनांची सुविधा आणि सुरक्षा लक्षात घेण्यासाठी हा नंबर तयार करण्यात आला आहे. प्लेटवर एक प्रकारची पिन असते जी वाहनाशी जोडलेली असते. ही पिन एकदा जोडली गेली की दोन्हीकडून लॉक होते. जर तुम्ही ही नंबर प्लेट लावली नाही तर व्यावसायिक वाहनांसाठी अडचणी वाढणार आहेत.

विना HSRP वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकेंड कॉपी, वाहनाच रजिस्ट्रेशन ट्रान्सफर,ऍड्रेस चेंज, रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन, RTO Hypothecation cancellation, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, Hypothecation endorsement, महिन्याचा टॅक्सनवीन परमिट, तातत्पुरतं परमिटस्पेशल परमिट, नॅशनल परमिट, EMI वाहनांचं निस्तारण ही कामे होणार नाहीत.

या नंबरप्लेट साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी दोन वेब पोर्टल तयार करण्यात आल्या आहेत. bookmyhsrp.com/index.aspx या वेबसाईटवर जाऊन सार्वजनिक किंवा व्यावसायिक वाहनांची माहिती भरा. आणि स्टिकरसाठी www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरा.

महत्वाच्या बातम्या-

नेहा कक्करच्या सुखी संसाराची सुरुवात होतास एक्स बॉयफ्रेंडने केला मोठा खुलासा…

कंगणाच्या अडचणीत वाढ; या कारणामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.