मुंबई | मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे सांगितले आहे.
आता या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१८ पासून रुग्णालयात सुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. याबाबत भंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी २०१८ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती.
त्यावेळी मदनकर यांना प्रशासनाने आग नियंत्रण यंत्रणा उपलब्धच नसल्याचे म्हटले होते. चिंतेची बाब अशी की, माहिती प्रशासनाने २०१८ रोजी दिली होती आणि त्यानंतर मदनकर यांनी जुलै २०२० रोजी पुन्हा याबाबत विचारणा केली असता तेव्हाही या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा नसल्याचे दिसून आले.
मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत…
याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘बर्ड फ्लू’ अलर्ट! चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; WHOने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
पोलीस चौकशीनंतर कंगनाने व्यक्त केला संताप, ‘तुम्ही राष्ट्रवादी असाल तर…’
धक्कादायक! कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू…