राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर होणार भारतात तयार झालेल्या कोरोना लसीची चाचणी

 

नवी दिल्ली | देशात तयार झालेल्या पहिल्या कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे.ही मानवी चाचणी चिरंजीत धीबर या व्यक्तीवर करण्यात येणार आहे.

चिरंजीत धीबर हे पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चिरंजीत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सदस्य ही आहेत.

कोरोना वायरस संपूर्ण देशात पसरत असताना मला कोरोनाला आळा घालण्यासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची संधी मिळाली असल्याचे मत चिरंजीत यांनी व्यक्त केले आहे.

ज्या कोरोना लसीचे चिरंजीत यांच्यावर परिक्षण होणार आहे ती लस भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद आणि भारत बायोटेक यांनी मिळून तयार केलेली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.