फोटोत दिसणारी ही चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना लावलाय वेड

इतक्यातच झालेल्या मदर्स डे निमित्त अनेक कलाकारांनी आपले आईसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले पाहायला मिळतात. चाह्त्यांचीही त्याला प्रचंड प्रमाणात पसंदी असलेले कळते. त्यातच एका चिमुरडीचा आपल्या आईसोबत असलेला फोटो व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. आता ही चिमुरडी आहे तरी कोण हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे.

ही चिमुरडी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रश्मी अनपट आहे. तिने तिच्या बालपणीचा फोटो मदर्स डेच्या दिवशी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. रश्मीच्या या लहानपणीच्या फोटोला चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

रश्मी अनपट मुळची पुण्याची आहे. तिने पुण्यातच आपल शालेय आणि महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असतानाच ती नाटकांमध्ये सहभाग घेत होती. तिची अभिनय क्षेत्रातील ओढ बघून घरच्यांनी तिला अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी मुंबईला जाण्यास सांगितले. तिच्या घरचे तिला अभिनयासाठी प्रोत्सान देत असत.

मुंबईला आल्यानंतर तिच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. तिने ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सुहासिनी, कुलस्वामिनी, फ्रेशर्स, अंग्निहोत्र २ अश्या अनेक मालिकांमध्ये काम केल. २०१३ मध्ये रश्मीने अभिनेता अमित जामखेड याच्याशी लग्न केले. अमितने हदयातर, हिरकणी या सारख्या अनेक चित्रपटात काम केल आहे.

रश्मी आणि अमितला ‘अभिर’ नावाचा मुलगा देखील आहे. भूमिकेत जीव ओतून काम करण आणि आपली वेगळी ओळख निर्माण करण ही रश्मीच्या अभिनयाची खासियत आहे. रश्मी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने इथवर पोहचली आहे.

रश्मी सध्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते. तिच्या आधी ही भूमिका विना जगताप साकारत होती परंतु तिची तब्येत बिघडल्या कारणाने तिने हा शो सोडला व ती भूमिका रश्मी साकारते. अगदी थोड्या दिवसाच्या कालावधीतच रश्मीने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

हे ही वाचा-

आदर पुनावालानंतर वडील सायरसही गेले लंडनला, पण वेगळेच कारण आले समोर; जाणून घ्या खरं काय..

सैराटफेम आर्चीच्या मनात आहे हा बॉलीवूड अभिनेता; म्हणतीय त्याच्यासोबत डेटवर जायचंय

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्स वरील डान्स बघून तुम्ही व्हाल घायाळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.