Share

मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..

आयपीएल २०२२ मध्ये मोठे-मोठे खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफ, फायनल पर्यत धडक मारतील याची कोणीही कल्पना केली नव्हती. गुजरात टायटन्स कडून खेळणारा डेव्हिड मिलर हा आयपीएल २०२२ मध्ये  स्टार बनला आहे.

गुजरात टायटन्स संघ पहिला हंगाम खेळत असून फायनल पर्यत धडक मारली आहे. क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान संघाचा पराभव केला आहे. धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सला डेव्हिड मिलरने अंतिम सामन्यात नेले आहे.

डेव्हिड मिलरने राजस्थान रॉयल बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मिलर याआधी राजस्थान संघात होता, आपल्या जुन्या संघाला पराभूत केल्यानंतर त्याने राजस्थान संंघाला खास संदेश दिला आहे. डेव्हिड मिलरने ट्टिट करून लिहिले आहे, “सॉरी रॉयल फॅमिली.”

https://twitter.com/DavidMillerSA12/status/1529185356876115968?s=20&t=p5HUfxVj4T1S70QjuVw4Nw

डेव्हिड मिलर राजस्थान रॉयलकडून मागिल दोन सिझन खेळला होता. राजस्थान रॉयलने २०२० ला मिलरला विकत घेतलं होतं. पण त्याला राजस्थान रॉयल कडून पूरेशी संधी मिळाली नाही. २०२० मध्ये मिलरला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. २०२१ मध्ये मिलरला नऊ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.

डेव्हिड मिलर ३८ चेंडूमध्ये नाबाद ६८ धावांच्या खेळीमुळे खूप मोठा स्टार बनला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये डेव्हिड मिलरला  एका कडू अनुभवाला सामोरे जावा लागलं होतं. मेगा  ऑक्शनच्या पहिल्या राऊंडमध्ये डेव्हिड मिलरवर कुठल्याही फ्रेचायजीने बोली लावली नव्हती.

मेगा ऑक्शनमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये गुजरात टायटन्सने डेव्हिड मिलरने त्याच्यावर ३ कोटी रूपयांची बोली लावली होती. मिलरवर बोली लावल्याच्या निर्णयााचा गुजरात टायटन्सला फायदा झाला आहे. डेव्हिड मिलरने  या सीझनमध्ये १५ सामन्यात ६४ च्या सरासरीने १४१ च्या स्ट्राइक रेटने ४४९ धावा केल्या आहेत.

महत्वांच्या बातम्या:-
‘गुजरातविरुद्ध संजू सॅमसन ४७ धावा करणार’ त्या व्यक्तीची भविष्यवाणी खरी ठरली; आता ‘विराटबाबत म्हणाला…
भारत जगाला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?
उमरानचा घातक चेंडू लागला मयंकच्या बरगडीत, जबर जखमी झाल्याने जागेवरच लागला रडू; पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now