खुशखबर! ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना; फक्त ५ रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा १ लाख

मुंबई : ग्राहकांसाठी बँक ऑफ बडोदाने एक जबरदस्त योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फक्त ५ रुपयांमध्ये बँकेमध्ये पेन्शनर बचत खातं उघडता येणार आहे. मात्र खातं फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. विशेष बाब म्हणजे फक्त ५ रुपयांनी उघडलेल्या या खात्यामध्ये अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत.

या योजनेचा लाभ बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी पेन्शनधारकसुद्धा घेऊ शकतात. यामध्ये २५ हजार रुपयांच्या धनादेशावर तात्काळ पत सुविधा मिळते. याशिवाय या बचत बँक खात्यात २ महिन्यांच्या पेन्शन रकमेमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. यासोबतच खात्यामध्ये, फ्री डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि बॉबकार्ड्स सिल्व्हर, अपघात विमा, अशा सुविधा उपलब्ध आहे.

याचबरोबर तुम्हाला शहरातील कोणत्याही शाखेत रोख रक्कम जमा करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मात्र या योजनेच्या माध्यमातून शाखेत रोख रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाहीये. यामध्ये प्रत्येक हजारासाठी २.५० रुपये दराने शुल्क आकारले जाते.

याबाबत बँकेने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मशीनमध्ये दररोज २० हजार रुपयांपर्यत कार्डलेस व्यवहार करू शकता. मशीनमध्ये खाते क्रमांक टाकून ही सुविधा मिळवू शकता. ठेवीवर मिळालेले व्याज तिमाहीत खात्यात जमा केले जाईल. महिना संपायच्या १५ दिवसांच्या आतमध्ये खात्यात व्याज जमा करणं गरजेचे आहे.

दरम्यान, पासबुक पूर्णपणे विनामूल्य असून डुप्लिकेट पासबुक मिळविण्यासाठी १०० रुपये जमा करावे लागतात. पहिल्या वर्षासाठी विनामूल्य डेबिट कार्ड उपलब्ध आहे. त्यानंतर दरवर्षी १०० रुपये दराने शुल्क आकारले जाते. चिप आधारित क्रेडिट कार्ड १ वर्षासाठी अपघाती मृत्यू विमा संरक्षण १ लाख दिले जाते.

महत्त्वाच्या बातम्या
कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले आनंद महिंद्रा; पहा व्हिडीओ
संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल; वाचा नेमकं काय त्या मेसेजमध्ये
शालूचा इश्किया अंदाज एकदा पाहाच; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.