तुमच्या बँक खात्यातून कट होणार १२ रुपये, बदल्यात मिळणार २ लाख, जाणून घ्या…

नवी दिल्ली । केंद्र सरकार अनेक वेगवेगळ्या योजना आणत असते. याचाच एक भाग म्हणून आता बँकांकडून पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना येत आहे. यासाठी एक मेसेज सध्या मोबाईल फोनवर येत आहे. ही एक महत्त्वाची योजना आहे. याबाबत सरकारने माहिती दिली आहे.

सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्वं ओढावल्यास इंश्युरन्स प्रदान करण्यात येतो. यामध्ये एका वर्षाचे कवर असणाऱ्या या योजनेला दर वर्षी रिन्यू करावे लागते. ज्यांनी यापूर्वीच या योजनेमध्ये नाव नोंदवले आहे.

अशा खातेधारकांच्या खात्यातून १२ रुपये प्रिमियम आकारले जाते. प्रती वर्षी तुमचे खाते या योजनेसाठी २५ ते ३१ मे या काळात डेबिट होईल. यामुळे ही माहिती महत्वाची आहे. या योजनेत सहभागी असल्यास तुम्हालाही खात्यात मोजकी रक्कम ठेवावी लागणार आहे.

या योजनेला लाभ १८ ते ७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना घेता येतो. ही योजना घेतेवेळीत PMSBY शी बँक खाते लिंक करण्यात येते. हा विमा घेणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्त्वं आल्यास त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या वारसाला २ लाख रुपयांची रक्कम मिळते. यामुळे ही योजना फायदेशीर आहे.

ज्या व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज नोंदणी केली आहे, अशाच व्यक्तींच्या खात्यातून ही रक्कम कापली जाणार आहे. कोणत्याही बँकेत जा तुम्हाला अर्ज भरता येणार आहे, अथवा बँकेच्या नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. यामुळे घरबसल्या देखील याचा अर्ज आपण भरू शकता.

ज्यांना ही योजना सुरुच ठेवायची आहे, त्यांच्या खात्यातून १२ रुपये कापले जातात. त्यामुळे या योजनेत सहभागी असल्यास तुम्हालाही खात्यात मोजकी रक्कम ठेवावी लागणार आहे. यामुळे आपण बँकेत जाऊन देखील याबाबत अधिक माहिती घेऊ शकतो.

ताज्या बातम्या

….म्हणून सुशील कुमारने हत्येदरम्यान स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड केला, पोलिसांची धक्कादायक माहिती

एवढ्या वर्षांनी खरे कारण आले समोर; ‘या’ कारणामूळे आदित्य चोप्रा कॅमेऱ्यापासून दुर पळतो

पैलवान सुशिल कुमारने ‘अशी’ केली सागर धनखडची हत्या; धक्कादायक कारणही आले समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.