RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार ना भिजणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) १०० रुपयांची नवी नोट आणणार आहे. या नव्या नोटेचे खास वैशिष्ट्ये आहे. ही नोट फाटू शकणार नाही. तसेच तिला कापताही येणार नाही. याशिवाय ती पाण्यात भिजणारही नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  १०० रुपयांच्या वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय अशा एक अब्ज नोटा छापणार असल्याची माहिती मिळाली आहे. या नोटा चलनात उतरवण्यामागील कारण म्हणजे त्या अधिक टिकाऊ आणि सुरक्षित राहतील.

सध्या या नोटा ट्रायल आधारावर जारी केल्या जाणार आहेत. फिल्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर वॉर्निश लावलेल्या नोटा बाजारात उतरवल्या जाणार आहेत. तसेच जुन्या नोटा हळू हळू बंद केल्या जाणार आहेत. आरबीआयने ही माहिती त्यांच्या वार्षिक रिपोर्टमध्ये दिली आहे.

सध्या चलनात नोटबंदीनंतर आलेली जांभळ्या रंगाची नोट आहे. वॉर्निश लावलेली नवी नोट ही सुद्धा जांभळ्या रंगाची असणार आहे. शिवाय या नोटेचे डिझाइन बदलले जाणार नाही. नोटेची क्वॉलिटी उत्तम असण्यासाठी आरबीआयने मुंबईमधील बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरीची स्थापना केली आहे.

रिझर्व्ह बँकेला दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांना रिप्लेस कराव लागतं. जगातील अनेक देश प्लॉस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करत आहेत. वॉर्निश लावलेल्या नोटाही अनेकवेळा मोडून चुरगळल्यावरही फाटणार नाहीत.

१०० रुपयांच्या नोटेचा कालावधी अडीच ते तीन वर्षांचा असतो. मात्र या नव्या नोटा साडेसात वर्षे टिकतील. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला या नोटा छापण्यास मान्यता दिली आहे. वित्तमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली होती.

महत्वाच्या बातम्या-
शिक्षण फक्त १२ वी पास, पण कमवत आहे लाखो रूपये, वाचा असा कोणता व्यवसाय करते ही महिला
…तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी उध्दव ठाकरेंच्या हाताखाली काम करावे- भाजप
‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ चे ऑडिशन सुरु; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? मोबाईलवरूनही…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.