बाबो! रिलीजच्या आधीच ‘या’ चित्रपटाने कमवले ३४८ करोड, बाहुबलीचाही रेकॉर्ड मोडला; पाहा ट्रेलर

लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा आगामी आर.आर.आर हा चित्रपट रिलीझच्या आधीपासूनच चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाचे आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नाव, तगडी स्टरकास्ट आणि बिग बजेट यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील दोन स्वातंत्र्य वीरांची कहानी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या कथेतील त्या वीरांची नाव सिताराम राजुरी आणि कोमराम भीम अशी आहेत. या दोन वीरांची संघर्षकथा या सिनेमात उलगडली जाणार आहे. भव्य सेट, लक्षवेधी ग्राफिक्स यामध्ये वापरण्यात आली आहेत.

१० भाषांमध्ये रिलीज होणार अशी घोषणा झाल्यानंतर चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी ३४८ कोटींची ऑफर देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बाहुबलीप्रमाणेच हा चित्रपट भव्यदिव्य असल्याची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात एनटीआर, रामचरण, अजय देवगन, आलिया भट्ट हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये रिलीझ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
येथे फक्त महिलांचेच राज्य! या गावात पुरूषांना पाय ठेवण्यास आहे बंदी
तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ
आरारारा खतरनाक… ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकचा टीझर प्रदर्शित
आरारारा राडा! १०० कोटी घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.