आता भाजपनेही कंगनाला फटकारले; ‘या’ प्रकरणी जाहीर माफी मागण्याचा दिला आदेश

मुंबई | नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली अभिनेत्री कंगना राणावत आता पुन्हा एकदा वादाच्या सापडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे कंगनावर टीका होतं आहे.
कंगनाने शेतकरी आजीबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे नेता आणि राष्ट्रीय प्रवक्ता आरपी सिंह यांनीही निशाणा साधला आहे. ‘तुझ्या धैर्याचा आणि अभिनयाचा मी आदर करतो. पण, कोणी माझ्या आईचा अवमान केला किंवा अनादर केला तर सहन करणार नाही, असे केल्यामुळे तू जाहीर माफी मागायला हवी,असे त्यांनी म्हंटले आहे.
.@KanganaTeam I respect you for your courage & acting but I will not accept anyone disrespecting or demeaning my mother. You must make a public apology for doing so.#MohinderKaur pic.twitter.com/uB835sJE1w
— R.P. Singh: ਆਰ ਪੀ ਸਿੰਘ National Spokesperson BJP (@rpsinghkhalsa) December 3, 2020
कंगनाला कायदेशीर नोटीस….
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
याबाबत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला सात दिवसांचा अल्टीमेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच सात दिवसात कंगनाने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असे म्हटले आहे. शेतकरी आंदोलनातील एक वृद्ध महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून कंगनाने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती.
वाचा काय आहे प्रकरण…
कंगनाने शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केले होते. कंगणाने ट्विट रिट्विट केले होते, त्यातील आजीला शाहीनबाग आंदोलनातील बिल्किसबानो सांगितलं गेले होते. ज्यावर कंगणाने विश्वास ठेवला होता आणि शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. परंतु नंतर तिने ट्विट डिलीट केले.
‘काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये’…
आता बठिंडा जिल्ह्यातील एका गावातल्या महिंदर कौर या आजीचा व्हिडिओ समोर आला आहे. या आजीने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आजी म्हणाल्या की, त्यांच्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यांना १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे तिच्या(कंगना) काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..
मराठवाड्यानेही भाजपला डावललं; सतीश चव्हाणांची तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक
भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; अरुण लाड यांचा विक्रमी मतांनी विजय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.