पवार, फडणवीसांच्या उपस्थीतीत भाजप नेत्याच्या मुलाचा शाही विवाह? सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

पुणे | कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सण, उत्सव, तसेच लग्न राजकीय कार्यक्रम हे साध्या पद्धतीने केले जात आहेत. मोठे कार्यक्रम करण्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीसुध्दा काहींनी मोठे राजकीय कार्यक्रम, विवाह सोहळे आयोजित करत सरकारचे नियम धाब्याबर बसवले आहेत.

कोल्हापुरचे भाजप नेते, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला महाविकास आघाडी सरकारमधील आणि भाजपमधील अनेक मोठे नेते उपस्थित होते.

धनंजय महाडिक यांचे सूपुत्र पृथ्वीराज यांच्या विवाहसोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना नेते संजय राऊत, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मोठे राजकीय नेते उपस्थित होते.

कार्यक्रमात सोशल डिस्टंन्सिंगला केराची टोपली दाखवण्यात आली होती. अनेक पाहूणे मंडळींनी तोंडाला मास्क लावला नव्हता. दरम्यान कालच मुख्मंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून कार्यक्रमांबाबत निर्बंध घालण्यात आले होते. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता भाजपच्या या मोठ्या नेत्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! सरकारचे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर ३० हजार तर चारचाकी खरेदीवर १ लाख ५० हजारांचे अनुदान
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील एका आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर
औरंगाबादेत करोना लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.