जुन्या साडीचं केलं भन्नाट जुगाड, ‘या’ जुगाडूची कला पाहून भलेभले झाले थक्क; पहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमधून मिळालेल्या कल्पनांचा लोक स्वत:च्या दैनंदिन जीवनात वापर करू शकतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये जुगाडू व्यक्तीने जुन्या साडीपासून दोरी बनवण्याच्या दाखवलेल्या कलेचं विशेष कौतुक होत आहे.

जुन्या साडीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतो. यामध्ये कुर्ते, पांघरुण घेण्याची कपडे, गादी किंवा उशीचा कव्हर यासाठी केला जातो. परंतु यावेळी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत व्यक्ती साडीपासून दोरी बनवताना दिसत आहे.

हा व्हिडीओ लेखक अव्दैत काला यांनी शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले आहे, ‘भारत कायमच आपल्या नवनव्या, अनोख्या प्रयोगांनी मला आश्चर्यचकित केल्यावाचून राहत नाही’. दरम्यान हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही मिनिटातच हा व्यक्ती मजबूत असा दोरखंड तयार करतो.

जवळपास सर्वच लोकांना दोरीची गरज लागते. विशेष करुन ग्रामिण भागातील लोक दोरीचा वापर जास्त करतात. त्यांची जनावरे बांधण्यासाठी, शेतातील विविध कामासाठी गावाकडे दोरीचा वापर सर्रास दिसून येतो. याशिवाय शहरी भागातील लोकांना आपले कपडे वाळत घालण्यासाठी, सामान बांधण्यासाठी दोरी गरजेची असते.

महत्वाच्या बातम्या-
“वर्षा बंगल्यावर धूणीभांडी, वॉचमनचं तरी काम द्या”, बेरोजगारांची मुख्मंत्र्यांकडे मागणी
एका रात्रीत ‘मजूर’ झाला ‘लखपती’, ४० रुपयांमध्ये खरेदी केलेल्या तिकीटावर लागली ८० लाखांची लॉटरी
काय सांगता! आता भांडी घासण्यासाठी ‘ऑनलाईन’ विकली जातेय ‘चुलीतली राख’

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.