आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांबाबत ‘ही’ भूमिका घ्या; संभाजीराजेंचे मराठा आंदोलकांना स्पष्ट आदेश

कोल्हापूर । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने पुकारण्यात आली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून खासदार संभाजीराजे देखील खूप आक्रमक झालेले दिसून येत आहे.

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतच्या लढ्यासाठी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज कोल्हापुरातून प्रारंभ करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आंदोलनात सहभागी होणार आहेत. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आंदोलन होईल.

या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील प्रमुख समन्वयक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे. आंदोलनाच्या तयारीची संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर मराठा समाजातील समन्वयकांची बैठक घेतली होती.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे आंदोलन होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील दोन मंत्री, बारा आमदार, दोन खासदार मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांची भूमिका आपण समजून घ्यायची आहे. त्यांना कोणीही उलटसुलट प्रश्न विचारायचा नाही. आपण मौन राखायचे.

मी, समन्वयक कोणी बोलणार नसल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. बुधवारी मूक मोर्चा नाही, तर आंदोलन होणार आहे. त्यामुळे त्यासाठी केवळ समन्वयकांनी उपस्थित राहावे. गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून या मूक आंदोलनाच्या माध्यमातून फुंकले जाणार आहे.

राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर जिल्हानिहाय मूक आंदोलनाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील लाल महाल ते मुंबईतील विधान भवन असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. यावर राज्य सरकार काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले? तज्ञ म्हणाले, आम्ही शिफारस केलीच नाही

धक्कादायक! कुंभमेळ्यातील १ लाख कोरोना चाचण्या बनावट, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती

विराट कोहलीच्या फ्लॅटपेक्षा दुप्पट महाग आहे युवराज सिंहचा फ्लॅट; किंमत वाचून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.