धडाकेबाज शतक झळकवत रोहितचे टीकाकारांना बॅटमधून चोख उत्तर

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकवले आहे. रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक ठरले आहे. त्याने भारताचा डाव सावरला आहे. महत्त्वाचे म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल दीड वर्षांनी रोहितचे शतक पाहायला मिळाले आहे.

रोहित शर्माचे हे शतक भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले आहे. भारताचे तीन फलंदाज माघारी परतले असताना रोहितने शांत खेळी केली आहे. मैदानावर रोहित आता चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. अजिंक्या रहाणे आणि रोहितने धावफलक फिरता ठेवला आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत भारताची धावसंख्या ३ बाद २०६ अशी झाली आहे.

रोहितच्या या शतकामुळे भारतीय संघ मजबुत स्थितीमध्ये पोहोचला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर दुसरा समाना भारतासाठी खूप महत्त्वाच बनला आहे. रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली धावसंख्या उभारता आली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र यानंतर भारताची सुरूवात खराब झाली. यानंतर रोहितने डाव सावराला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.