रोहित शेट्टीचे पितळ पडले उघडे! ‘असे’ शूट होतात चित्रपटातील कार स्टंट, पहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चित्रपट हे स्टंट आणि अ‍ॅक्शनने खचाखच भरलेले असतात. रोहित शेट्टी म्हटले की चित्रपटात स्टंट आणि तोडाफोडीचे समीकरण ठरलेलेच असते. परंतु हे स्टंट शूट कसे केले जात असतील हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमी पडतो. आज हे स्टंट कसे शूट केले जातात ते समोर आले आहे.

रोहित शेट्टी त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान रोहित शेट्टी चित्रपटात नेहमीच करत असलेल्या कार स्टंटचे पितळ उघडे पडले आहे. अभिनेता रणवीर सिंगने याबाबतचा एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केला आहे. यामधून चित्रपटातील स्टंट कसे शूट केले जातात हे समोर आले आहे.

रणवीरने शेअर केलेल्या या व्हिडीओत रोहित शेट्टी स्वत: कार चालवताना दिसत आहे. रोहित शेट्टी चालवत असलेल्या याच कारची टक्कर आणि तोडफोड स्क्रिनवर दाखवली जाते. व्हिडीओत रणवीर बोलत असल्याचे ऐंकू येत आहे. यामध्ये तो म्हणतो, ‘देशातला सर्वात मोठा स्टंट दिग्दर्शक’ यानंतर रणवीर व्हिडीओ शूट करत असल्याचे कार चालवणाऱ्या रोहितला समजते तो त्याला ‘अरे तू शूट करत आहेस?’ असं विचारतो आहे.

व्हिडीओत स्पष्ट पाहायला मिळत आहे की, रोहित शेट्टी चालवत असणारी कार क्लोन कार आहे. क्लोन कार मोठ्या कारचे छोटे रुप असते. परंतु स्क्रिनवर स्टंट दरम्यान याच छोट्या कारचा वापर केला जातो. क्लोन कारचे व्हिज्युअल इफेक्ट असतात ते स्क्रिनवर खऱ्याखुऱ्या कारचे असल्यासारखे आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात.

रणवीरने शूट केलेला हा व्हिडीओ रोहितचा आगमी चित्रपट ‘सर्कस’च्या सेटवरील आहे. व्हिडीओत सेटवर अशा प्रकारच्या अनेक कार असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करताना रणवीरने लिहले आहे ‘हे आपल्या कामाला खूपचं गंभीरतेने घेतात.’ या व्हिडीओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ धक्कादायक कारणामूळे अभिनेत्री काजोलने आजपर्यंत गोविंदासोबत काम केले नाही
डिंपल कपाडिया नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे काकांचे पहीले प्रेम; शेवटच्या दिवसांमध्ये देखील राहत होते एकत्र
ऐश्वर्याने कुटूंबाच्या विरोधात जाऊन दिले होते किसींग सीन्स; मिळाली होती नोटीस
बडीशेपची शेती करुन ‘हा’ पठ्ठ्या करतोय लाखोंची कमाई; वाचा कशी करता येईल ही शेती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.