दान करताना फोटो काढणाऱ्या सेलिब्रिटींवर रोहित शेट्टी भडकला; म्हणाला फोटोग्राफर्सना फोन करून बोलावल्याशिवाय…..

सध्या ‘खतरों के खिलाडी ११’ ची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने पुन्हा एकदा ‘खतरों के खिलाडी’मध्ये त्यांचा इतर काही हात नसल्याचे दाखवून दिले आहे. यावेळीही शोचे रेटिंग गगनाला भिडत आहे. तसेच लोकांना रोहित शेट्टीच्या जोरदार शैलीतील होस्टिंग पाहायला खूप आवडते.

अनेक वेळा रोहित शेट्टी स्पर्धकांना स्टंटसाठी प्रेरित करतात आणि काहीवेळा ते त्यांची शाळा घेतानाही दिसतात. आता रोहित शेट्टी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. वास्तविक, रोहित शेट्टी स्टार आणि सेलिब्रिटींवर संताप व्यक्त केला आहे, जे फोटोग्राफर्सना मंदिराबाहेर दान करताना बोलावतात. यासोबतच रोहित शेट्टीने विमानतळ आणि जिम लूकवरही भाष्य केले आहे.

रोहित शेट्टी का एयरपोर्ट लुक्स पर तंज, 'पहले तो बनियान में ट्रैवल करते थे' - Hindi News, हिंदी न्यूज़ , Hindi Samachar, हिंदी समाचार, Latest News in Hindi, Breaking News in ...

निर्माता रोहित शेट्टी इतक्यातच ‘विथ जेनिस’ नावाच्या चॅट शोमध्ये दिसला. या दरम्यान, फोटोग्राफर्सना मंदिराच्या बाहेर बोलावण्याच्या प्रकृतीवर ते म्हणाले, ‘अस कोण करत? तसेच नसेल करत तर मी आज या मंदिराच्या बाहेर आहे अस फोटोग्राफरला कस कळेल. त्यांना फोन करून सांगत असतील तेव्हाच कळत असेल ना.

यासह रोहित शेट्टीने विमानतळाच्या लुकबद्दल सांगितले की, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य विमानतळावर ट्रॅक पँट आणि चप्पलवर घालवले. पण, आता यांचा वेगळा खर्च सुरु झाला आहे. जोपर्यंत फोटोग्राफर विमानतळावर पोहोचत नाही तोपर्यंत लोक उतरत नाही. त्यातच हा जिम लूकही नवीन आहे, आणि लोक किती वेडे असतील या गोष्टीला घेऊन.

त्यांच्या कामाबाबत बोलायचे झाले तर रोहित शेट्टी सध्या देशातील सर्वाधिक हिट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. ज्यांचे चित्रपट सुरुवातीपासून हिट होत आहेत. गोलमाल फ्रँचायसी, सिंघम फ्रँचायसी, बोल बच्चन, चेन्नई एक्सप्रेस, दिलवाले, सिम्बा हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

त्याचबरोबर लोक त्याच्या पुढील सूर्यवंशी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर रणवीर आणि अजय देवगण देखील चित्रपटात कॅमिओ करताना दिसतील. हा चित्रपट मार्च २०२० मध्येच प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या-

१४१ वर्षांचा इतिहास असलेल्या फोर्ड कंपनीने भारतातून का गुंडाळला बाज्याबोजा?
17 महिन्यांच्या अयंशच्या आजाराबद्दल समजताच अमिताभ झाले भावुक, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी लगेच दिले पैसे
फक्त पैसे कमावण्यासाठी BCCI ने धोनीला टिम इंडीयात घेतलय; वाचा पडद्यामागचे सत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.