३० कोटीच्या आलिशान घरात राहतो रोहित शर्मा; आतील सुविधा पाहून थक्क व्हाल

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आज अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एकेकाळी आर्थिक संकटाचा सामना करणारा रोहित शर्मा आज अब्जावधी मालमत्तांचा मालक आहे तो मुंबईत अगदी आलिशान घरात राहतो.

रोहितचा मुंबईत येथील वरळी भागात त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील चार बेडरूमचा फ्लॅट आहे याची किंमत ३० कोटी आहे. रितिका सजदेह हिच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर रोहित शर्माने, ३० कोटी रुपयांना वरळीतील हे घर खरेदी केले होते. लग्नानंतर रोहित शर्मा या घरामध्ये राहण्यासाठी गेला.

तसेच शर्मा आणि रितिकाच्या या फ्लॅटमधील इंटीरियर सिंगापूरमधील पालमर ॲण्ड टर्नर आर्किटेक्ट्स यांनी डिजाइन केले आहे. ४ बीएचके फ्लॅट ५७०० चौरस फुटांपर्यंत पसरलेला आहे. तसेच लिव्हिंग रूमचे क्षेत्रफळ सुमारे ७५० चौरस फूट आहे. बाल्कनीमधील भिंतीसाठी ग्लास वापरला गेला आहे.

तर मास्टर बेडरूममध्ये पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. हे सुमारे ५९० स्क्वेअर फूट मध्ये बनविले गेले आहे. बिल्डिंगमध्ये क्लब हाऊस आणि मनोरंजन क्षेत्र आहे. येथे योग कक्ष, स्पा सेंटर, मिनी थिएटरची सुविधा देखील आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.