टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. यावेळी सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
दुखापतीनंतर रोहित शर्मा भारतीय संघाकडून प्रथमच खेळला. तसेच अनेक वादांनंतर रोहित शर्माचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी कांगारूंविरुद्ध रोहितने ९९ षटकार ठोकलेले आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४२३ षटकार ठोकले आहेत. त्यापैकी रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९९ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने सिडनीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात आणखी एक षटकार ठोकला आहे. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० षटकार ठोकणारा रोहीत पहिला खेळाडू झाला आहे.
यापूर्वीच रोहितच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार केल्याचा विक्रम आहे. इंग्लंडचा इयन मॉर्गन ६३ षटकारांसह दुसर्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी ७० रनची ओपनिंग पार्टनरशीप केली.
महिलांसाठी लष्करात मोठी संधी! अट फक्त १० वी पासची; ‘अशी’ करा नोंदणी
वाहतूकीचे नियम मोडल्याने रतन टाटा यांना ई चलन? तक्रारीनंतर धक्कादायक माहिती आली समोर
‘कोरोनामुळे परवानगीची प्रक्रिया पुर्ण झाली नाही’; अनधिकृत बांधकामवर सोनू सूदचे स्पष्टीकरण