Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यापासून त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी अनेक दिग्गजांची मागणी आहे.
त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे जिथे भारताने दुसरा टी-२० सामना जिंकला आहे. दरम्यान, बीसीसीआयने टी-२० फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराचा शोध सुरू केला आहे.
मात्र, दरम्यान, अशी बातमी आहे की, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी हार्दिकला टी-20 संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनवले जाऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माकडून टी-20 संघाची कमान काढून घेतली जाऊ शकते, पण रोहित एकदिवसीय आणि कसोटीत सामन्यात कर्णधार राहील.
बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, “ही बदलाची वेळ आली आहे. आपल्या सर्वांना असे वाटते की रोहितकडे अजूनही खूप काही देण्यासारखे आहे पण त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या आहे. त्याचे यश एका पराभवाने विसरता येणार नाही पण त्याचे वयही वाढत आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, “आम्हाला आतापासूनच २०२४ च्या टी२० विश्वचषकाची तयारी सुरू करावी लागेल. या भूमिकेत हार्दिक योग्य आहे. पुढील T20 मालिकेपूर्वी निवडकर्ते भेटतील आणि हार्दिकची नवीन भारतीय कर्णधार म्हणून घोषणा करतील.
टीम इंडियाला पुढील वर्षी श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत बोर्ड लवकरच हार्दिकला टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने 4 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
यादरम्यान भारताने सर्व सामने जिंकले आहेत. हार्दिकने आयर्लंड दौऱ्यावर 2 सामन्यांच्या T20 मालिकेत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव T20 सामन्याचे नेतृत्व केले आहे. यासह हार्दिकची न्यूझीलंड दौऱ्यासाठी तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी देखील कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, जिथे टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली एक सामना जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या
नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमातील अभिनेत्याला ५ लाखांचे दागिने चोरल्यामुळे अटक; मुद्देमालही जप्त
विक्रम गोखलेंची प्रकृती सुधारली, व्हेंटीलेटरही काढणार; स्वत: डॉक्टरांनीच दिली महत्वाची अपडेट
भाजप-शिंदे सरकार कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी; केंद्रातील नेत्यांनाही लागलीय भनक