Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नेदरलँड्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मोठ्या खेळीच्या शोधात असलेल्या रोहितसाठी हा दिलासा मानला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने तिस-या षटकात केवळ ११ धावांच्या धावसंख्येवर केएल राहुलच्या रूपाने आपली पहिली विकेट गमावली.
त्यानंतर हिटमॅनने विराट कोहलीसोबत भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला आणि तो एका मजबूत स्थितीत नेला. मात्र, याच दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माशी संबंधित एक लाजिरवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो पायजमा काढून उभा आहे.
वास्तविक, ही घटना भारतीय संघाच्या डावाच्या दहाव्या षटकानंतर घडली. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा इनिंग ब्रेक मिळण्याच्या मध्यंतरी विराट कोहलीशी गप्पा मारताना दिसतो. यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह पाणी देण्यासाठी आलेला युजवेंद्र चहलही उपस्थित होता. विराट हात हलवत रोहितला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.
https://twitter.com/FaizKha20207684/status/1585542018184331264?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585542018184331264%7Ctwgr%5Ed5c03e82688d9c5ee6583588ef6e0f201be249b7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D173256action%3Dedit
त्यावेळी रोहित शर्माने पायजमा खाली सरकवून आपली जर्सी व्यवस्थित केली. परंतु, तेव्हाच कॅमेरा त्याची ही छायाचित्रे टिपतो, ज्यामध्ये रोहितचे आतील कपडे दिसतात. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
यासोबतच भारत विरुद्ध नेदरलँड्स सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने आधीच विरोधी संघाच्या गोलंदाजांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, केएल राहुलच्या रूपाने भारताला आपली पहिली विकेट दुर्दैवी गमवावी लागली. कारण मैदानावरील पंचांनी केएलला एलबीडब्ल्यू घोषित केले. यावर रोहित शर्माने रिव्ह्यू घेण्यास नकार दिला.
त्यानंतर डाव पुढे नेण्याची जबाबदारी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खांद्यावर आली. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला वेळ मारून नेली आणि नंतर नेदरलँडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विराट-रोहितमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली. ८४ धावांच्या एकत्रित धावसंख्येवर हिटमॅनच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला.
रोहित बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या सूर्यकुमार यादवनेही आपल्या शैलीत फलंदाजीला सुरुवात केली. विराट-सूर्या जोडीने शेवटच्या षटकात जबरदस्त फॉर्म घेत फटकेबाजी केली. तसेच आपापल्या अर्धशतकांनी भारताची धावसंख्या १७९ पर्यंत नेली.
महत्वाच्या बातम्या
Rohit Sharma : रोहित शर्माकडे टी-२० मधून निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही, आकडेवारी देत आहे साक्ष
Team India : वर्ल्डकपच्या आधीच रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, आता पुन्हा शोधावा लागणार नवीन फलंदाज
Rohit Sharma : रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला, ‘या’ खेळाडूने ४२ चेंडूत ठोकले नुसते चौकार आणि षटकार; केल्या २६८ धावा
World Cup: वर्ल्डकपआधी भारतीय संघाचा मोठा निर्णय; रोहित शर्मा ऐवजी केएल राहुलला केले कर्णधार