विराटने रोहित शर्माला वगळल्याने उडाला ‘भडका’; मुंबई इंडियन्सने केलं ‘हे’ ट्विट

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. याबाबत मुंबई इंडियन्सने ट्विट केले आहे.

पहिल्या टी-२० सामन्याचा संघ घोषित झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. या सामन्यासाठी रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. त्याशिवाय संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान देण्यात आले नव्हते.

आयपीएल स्पर्धेत मंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितला वगळण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितबाबत एक ट्विट केले. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, “रोहितला पहिल्या काही टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे.”

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लगला आहे. रोहितच्या जागी संधी मिळालेला सलामीवीर के एल राहूल अवघी एक धाव करून माघारी परतला. यापाठोपाठ लगेचच कर्णधार विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. तर शिखर धवन देखील ४ धावांवर बाद झाला. हिटमॅन रोहित शर्मा याला पहिल्या सामन्यात खेळाताना पाहायला न मिळाल्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली.

विराट कोहली, के एल राहूल, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, भूवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल हे खेळाडू टीम इंडियाकडून मैदानात उतरले होते.

महत्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! मिताली राजने बनवला भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला पहिला सामना
वीरेंद्र सेहवागची तुफान फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर चौकार तर षटकार खेचत अर्धशतक; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.