पाया पडण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याला रोहित शर्माने सांगितली ‘ही’ गोष्ट; वाचून अभिमान वाटेल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळला गेला. भारताच्या टी २० संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने सकारात्मक सुरुवात केली आहे. दुसऱ्या टी २० मध्ये न्यूझीलंडचा पराभव करून भारताने मालिकेत २-० ने मालिकेत आघाडीवर आहे.

टीम इंडिया जिंकली तेव्हा सामन्यातील २० चेंडू बाकी होते. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली. टीम इंडिया जेव्हा फिल्डिंग करत होती तेव्हा या मॅचमध्ये एक अप्रतिम नजारा पाहायला मिळाला. रोहित शर्माच्या एका चाहत्याने चक्क सुरक्षा व्यवस्थेचा भंग करून जमिनीवर जाऊन त्याच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी न्यूझीलंडचा डाव सुरू होता. अशा स्थितीत रोहित शर्मा मैदानावर फिल्डिंग करत होता. यावेळी रोहित मैदानावर उपस्थित असताना त्याचा चाहताही त्याच बाजूला होता. हिटमॅनच्या चाहत्याने सुरक्षा व्यवस्थेला बगल देत मैदानात घुसून रोहितला गाठले. यादरम्यान त्याला रोहितच्या पायाला हात लावायचा होता पण हिटमॅनने त्याला दुरूनच तसे करण्यास सांगितले.

यानंतर चाहत्याने जमिनीवर पडून रोहित शर्माला नमस्कार केला. रोहितने चाहत्याला सांगितले की ही कोविडची वेळ आहे आणि जर त्याला बाहेरील कोणी स्पर्श केला, तर त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. कारण आता बायो-बबलची वेळ आली आहे ज्याला क्रिकेटर्स खूप गांभीर्याने घेत आहेत.

यादरम्यान सुरक्षा रक्षकही रोहितच्या चाहत्याचा पाठलाग करताना दिसला. त्याला पकडण्याआधीच रोहितचा चाहता मैदानाबाहेर पडला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. हिटमॅनच्या या चाहत्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, या सामन्यात पहिल्या डावात खेळताना न्यूझीलंडने सहा गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या होत्या. भारताने १५४ धावांचे लक्ष्य १७.२ षटकांत सात राखून पूर्ण केले. टीम इंडियाकडून केएल राहुलने ६५ धावा केल्या. तर रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळताना ५५ धावा केल्या. सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
लोकांनी झापल्यावर अवधूत गुप्तेची सपशेल शरणागती; गोखलेंच्या वक्तव्यावर म्हणाला पटलं नाही तरी…
रोहितने एकाच सामन्यात तोडला दोन महान खेळाडूंचा रेकॉर्ड; आफ्रिदीलाही टाकले मागे
मराठमोळ्या मुलाच्या कल्पकतेला आनंद महिंद्रांची दाद; बिझनेससाठी दिली कोट्यवधींची ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.