Share

‘क्रिकेटचे बॉल खाण्यासारखे आहेत’; रोहीत शर्माच्या विचीत्र ट्विट्सने क्रिकेटविश्वात खळबळ

rohit shrma

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे(Rohit Sharma) ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. आज रोहित शर्माच्या अधिकृत ट्विटर(Tweeter) अकाऊंटवरून काही विचित्र ट्विट शेअर करण्यात आले आहेत. हे ट्विट पाहता टीम इंडियाचा कर्णधार(Captain) रोहित शर्माचे ट्विटर खाते हॅक झाल्याचे क्रिकेट चाहत्यांना वाटत आहे. रोहित शर्माने अद्याप याबाबत काही स्पष्टीकरण दिले नाही.(rohit sharma strange tweets viral)

यातील एका ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मला नाणे नाणेफेक आवडते, खासकरून जेव्हा ते माझ्या कोर्टात पडतात.” दुसऱ्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “क्रिकेट बॉल खाण्यायोग्य आहेत.” त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे भारतीय चाहत्यांना वाटत आहे. अशाचप्रकारे आणखी दोन ट्विट्स करण्यात आले आहेत.

नुकतेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. रोहित शर्मा प्रथमच कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ४ मार्चपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना मोहाली येथील IS बिंद्रा पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी BCCI कडून प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसमोर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी ५०% प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल, अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) चे सचिव संतोष यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मोहम्मद कैफने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले होते. यावेळी मोहम्मद कैफने रोहित शर्माच्या बाबतीत एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये मोहम्मद कैफने लिहिले होते की, “रोहित शर्मासोबत काळजीपूर्वक हस्तांदोलन करा. आजकाल त्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीचे सोने होतं आहे.”

महत्वाच्या बातम्या :-
रेमोला ‘कालिया’ आणि ‘कालू’ म्हणायचे लोक, यायचा खुप राग, पण आईच्या ‘या’ गोष्टीने बदलले विचार
युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हा शीख बनला ‘देवदूत’, जेवणासाठी ट्रेनमध्ये चालवला लंगर
दिल्लीने कर्णधार पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर अखेर श्रेयसने सोडले मौन; पहील्यांदाच प्रतिक्रीया देत म्हणाला….

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now