रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला, आपल्या खेळाडूंना स्वातंत्र्य देणं खुप गरजेचं कारण…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी रांची येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने किवी संघाचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने टी २० मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.

रोहित शर्मा, केएल राहुल आणि हर्षल पटेल यांनी भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. न्यूझीलंडवर विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल स्पष्ट मत मांडले. ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

न्यूझीलंडला सात गडी राखून पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा सांगितले की, आम्ही खडतर परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे, न्यूझीलंडचा संघ खूप मजबूत आहे आणि ते उत्तम क्रिकेट खेळत आहेत, या सामन्यात आम्ही एका विकेटने गती मिळवू शकत होतो.

तसेच टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे आणि क्रिकेट खेळण्यासाठी नवीन खेळाडू सतत येत आहेत. माझे पहिले ध्येय हे असेल की जेव्हा जेव्हा खेळाडू खेळायला येतात तेव्हा त्यांना आरामदायक वाटेल, मैदानावर येताना इतर गोष्टींची चिंता सोडून खेळाडूंना पुरेसे स्वातंत्र्य देणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना फक्त आणि फक्त खेळाबद्दल विचार करता येईल.

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, भारताची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे आणि हा संघ खूप तरुण आहे, रोहितच्या मते, काही खेळाडू खूप सामने खेळले आहेत, काही त्यांच्या वळणाची वाट पाहत आहेत, परंतु त्यांची वेळ देखील येईल, असे रोहित म्हणाला आहे. प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, जो खेळाडू मैदानात असेल त्याने आपले काम पूर्ण केले पाहिजे, असेही रोहितने म्हटले आहे.

हर्षल पटेल आणि व्यंकटेश अय्यर यांनी शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियासाठी टी-२० पदार्पण केले. हर्षल पटेलसाठी हा सामना खास होता कारण त्याने धोकादायक गोलंदाजी करताना किवी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. याशिवाय त्याने दोन विकेट्सही घेतल्या. सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजीबद्दल हर्षल पटेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय व्यंकटेश अय्यरने या सामन्यात १२ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
तळीरामांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली
दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढेही झुकली दिल्ली! आंदोलकांच्या मागण्यांना यश
‘शेतकऱ्यांची माफी मागून नरेंद्र मोदींनी दाखवली नम्रता; काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.