Share

मी खूप निराश आहे, माझ्यासोबत यापुर्वीही असे घडलेय..; रोहीत शर्माच्या वक्तव्याने खळबळ

आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली नाही. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्माला देखील या सीझनमध्ये मोठी खेळी करता आली नाही. या सीझनमध्ये आतापर्यंत रोहित शर्माचा फॉर्म खराब राहिला आहे. मागील सामन्यात रोहित शर्मा अवघ्या दोन धावा करून बाद झाला होता.(rohit sharma statement on cricket form)

आयपीएल २०२२ च्या १४ सामन्यांमध्ये रोहीत शर्माने फक्त १९ च्या सरासरीने २६८ धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात रोहीत शर्माला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. भारतीय संघाचे आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक पाहता कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म खरोखरच चिंतेचा विषय आहे.

नुकतंच एका पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या फॉर्मबद्दल वक्तव्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “मला अनेक गोष्टी करायच्या होत्या, पण त्या मी करू शकलो नाही. आयपीएलच्या या हंगामातील माझ्या कामगिरीने मी खूप निराश आहे.”

“पण माझ्यासोबत यापूर्वीही असे घडले आहे. त्यामुळे मी पहिल्यांदाच यातून जात आहे असे मला वाटत नाही. मला माहित आहे की क्रिकेट इथेच संपत नाही, पुढे जाऊन खूप क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे मला मानसिक पैलूवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मी फॉर्ममध्ये कसा परत येईन आणि मला संघासाठी चांगली कामगिरी कशी करता येईल याचा विचार मला करायला हवा”, असे रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “हा हंगाम आमच्यासाठी थोडा निराशाजनक होता. आम्ही आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीला आमची रणनिती अंमलात आणू शकलो नाही. आम्हाला माहित आहे की आयपीएलसारख्या स्पर्धेत तुम्हाला खेळात सातत्य ठेवावं लागतं. आम्ही जी काही रणनीती आखली होती, ती अंमलात आणण्यात आम्ही अयशस्वी ठरलो”, असे रोहित शर्माने सांगितले.

आयपीएल २०२२ च्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग आठ सामन्यांत एखाद्या संघाला पराभवाचा स्विकारावा लागण्याची ही पहिलीच वेळ होती. पण आयपीएलच्या उर्वरित सहा सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने उत्तम खेळी करत चार सामने जिंकले.

महत्वाच्या बातम्या :-
घोषणा मोठी पण दिलासा नाही! राज्य सरकारकडून पेट्रोल डिझेलवर कर कमी मात्र दर ‘जैसे थे’च?
भयानक! कॉलेजमधून २०० फुटांवर ओढत नेले, नंतर चाकु भोकसून केला खुन; हत्येच्या कारणाने पोलिस हादरले
ग्राहकांशी वारंवार गडबड करणाऱ्या OLA, UBER ला सरकारने पाठवली ‘ही’ नोटीस, दिला मोठा दणका

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now