न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मोहम्मद सिराजला मारली चापट, व्हायरल झाला व्हिडीओ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना खूपच रोमांचक झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच T20 सामना होता.

हा सामना भारतीय संघाच्या कामगिरीमुळे चर्चेचा विषय असला तरी रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित डगआउटमध्ये बसला आहे आणि मोहम्मद सिराजला मारताना दिसत आहे.

हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा टीम इंडिया 165 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करत होती. त्यावर भारतीय संघाचे दोन फलंदाज होते आणि बाकीचे सर्व खेळाडू प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत डगआउटमध्ये बसले होते.

यादरम्यान अचानक कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजला एक थप्पड दिली. रोहितचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, रोहितने हे कृत्य चेष्टेने केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

अनेकदा टीमच्या खेळाडूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये ते एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात. सुमारे वर्षभरापूर्वी मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये सिराजने कुलदीपचा गळा पकडलेला दिसत होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजला दुखापत झाली. फलंदाजाने शॉट मारल्यावर चेंडू हाताला लागला आणि बोटातून रक्त येऊ लागले. सिराजने ताबडतोब फिजिओला बोलवण्याचा इशारा केला आणि थोड्या वेळाने पट्टी बांधून बॉलिंग केली. शेवटच्या षटकात त्याने चांगली बॉलिंग करत 7 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. सिराजच्या या धाडसाचे खूप कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.